Search This Blog

Sunday, 24 March 2019

कलिंगडाचे पोळे

कलिंगडाचे पोळे




साहित्य  :  कलिंगडाचा लाल भाग खाल्यानंतर उरलेला पांढरा भाग किसून घ्यावा, हा कीस दोन वाट्या, तांदूळ दोन वाट्या, एक वाटी किसलेले ओले खोबरे, चवीपुते  मीठ व तेल.
कृती : प्रथम तांदूळ धुऊन घ्यावे,मग त्यात कलिंगडाचा कीस व ओल्या नारळाचा चव घालून  मिक्‍स करून दहा मिनिटे झाकून ठेवावे.  नंतर मिक्सरवर वाटून घ्यावे व चवीपुरते मीठ घालून ढवळून घ्यावे. 
गॅसवर तवा तापत ठेवावा. तव्यावर तेल सोडून दावाने पीठ पसरून पोळे काढावे.  उलटून भाजून घ्यावेत. कोणत्याही चटणीबरोबर गरम पोळे सर्व्ह करावे. 

No comments:

Post a Comment