Saturday 9 March 2019

पिकलेल्या (लाल) टोमॅटोचे भरीत


पिकलेल्या (लाल) टोमॅटोचे भरीत







पिकलेल्या (लाल) टोमॅटोचे भरीत
साहित्य : ३-४ पिकलेले लाल टोमॅटो,एक मोठा कांदा,वाटीभर मलईचे(सायीचे) दही, चवीनुसार १-२ हिरव्या मिरच्या,४-५ लसणाच्या पाकळ्या,चवीनुसार मीठ,एक छोटा चमचा जिरे,एक टेबलस्पून शेंगदाण्याचे जाडसर कूट,मूठभर ताजी कोथिंबीर.
कृती ; प्रथम टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या गॅसवर ग्रिल ठेवून भाजून घ्या. भाजातांना टोमटोची सालं सुटायला आली की गॅस बंद करा.
दरम्यान दुसरीकडे कांदा,लसणाच्या पाकळ्या आणि कोथिंबीर बारीक चिरून ठेवा. जिरे भाजून जाडसर कुठून ठेवा. भट्टीवर भाजून आणलेले शेंगदाणे कुठून भरड (जाडसर) कूट करून घ्या. 
भाजलेले टोमॅटोची साले सोलून व भाजलेल्या मिरच्या चॉप करून घ्या. 
आता एका मोठ्या बाउलमध्ये हे सगळे घटक व मलईचे(सायीचे) दही घालून हाताने मस्तपैकी कुस्करून घ्या. (हाताने कुस्करणार असाल तर मिर्ची शेवटी घाला, नाहीतर हाताची आग होईल)
चव पाहून मीठ घालून मिक्स करा.
वरतून मस्तपैकी शेंगदाण्याचे एक टेबलस्पून कच्चे तेल किंवा तुपातळी हिंग-जिर्‍याची फोडणी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.
झालं तयार चटपटीत टोमॅटोचे भरीत
टीप : तुम्हाला हवं तर तुम्ही या टोमॅटोच्या भरतात कांद्याची पातही घालू शकता.



No comments:

Post a Comment