शेवग्याच्या
शेंगाची भाजी
साहित्य: ५-६ शेवग्याच्या
शेंगाचे ३" लांबीचे तुकडे, सुक्या गोटा खोबर्याचे
काप,दोन टेबलस्पून तांदुळ, दोन टेबलशून
चिरलेली कोथिंबीर
कृतीः शेवग्याच्या शेंगा
मीठाच्या पाण्यांत घालून शिजवून घ्याव्यात.मग कढईत चमचाभर तेल घालून खोबरे,
तूरडाळ, तांदुळ, कांदा
एक एक करुन लालसर रंगावर परतुन घ्यावे. थंड झाल्यावर परतलेले सर्व साहित्य,
लाल तिखट, काळा मसाला, शेंगदाणे,
लसून, जिरे, कोथिंबीर ,
थोडे पाणी घालुन मिक्सर वर बारीक (एकजीव) करुन घ्यावे. आता गॅसवर एका
कढईत फोडणीसाठी डावभर तेल गरम करुन मोहरी,
जिर्याची फोडणी करुन त्यामध्ये तयार केलेला मसाल्याचा गोळा तेल
सुटेपर्यंत परतुन घ्यावा.नंतर त्यात शिजवलेल्या शेंगा, मिठ व
लागेल तेवढे पाणी घालून मंद आचेवर भाजी शिजवून घ्यावी.
सर्व्ह करतेवेळी वरून चिरलेली कोथिंबीर भुरभुरावी.
No comments:
Post a Comment