साहित्य : एक ब्रोकोलीचा गड्डा,३-४ छोटी गाजरे ,एक मध्यम आकाराचा टोमॅटो, एक मध्यम आकाराचा उकडलेला बटाटा,२-३ छोटे लाल कांदे (शक्यतो कांद्याच्या पातीतील) ,५-६ लसणाच्या पाकळ्या,एक पेरभर आल्याचा तुकडा,एक लवंग,एक छोटा चमचा जिरे पावडर, एक छोटा चमचा धने पूड,चवीनुसार (एक छोटा चमचा) मिरे पूड, मीठ व साखर,दोन टेबलस्पून लोणी.
कृती : गाजर उभे चिरून बारीक स्टिक्स करा, टोमॅटो आणि कांदे बारीक चिरुन घ्या. ब्रोकोलीचे छोटे छोटे तुरे चिरून ठेवा.उकडलेला बटाटा चिरून फोडी करून घ्या.
आता एकीकडे एका पॅनमध्ये वरील सगळ्या भाज्या घेऊन वाफवून घ्या.
दुसरीकडे मिक्सरच्या भांड्यात बटाट्याच्या फोडी,आल्याचा तुकडा,लसणाच्या पाकळ्या,जिरे-धने पूड,काळे मिरे पूड,लवंग वाटून पेस्ट बनवून ठेवा.
आता एका पॅनमध्ये वाफवून घेतलेल्या सर्व भाज्या (ब्रोकोली,कांदा,गाजराच्या चिरून ठेवलेल्या स्टिक्स,बारीक चिरलेला टोमॅटो घालून त्यात मिक्सरवर केलेले मसाल्याचे वाटणाची पेस्ट घाला व मिक्स करून घेऊन दाटपणा हवा तसा ठेवत आवश्यक तेव्हढेच पाणी घालून गॅसवर सूप उकळून घ्या आणि एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्या.
गरमागरम ब्रोकोलीचे सूप सर्व्हिंग बाऊल मध्ये काढून त्यावर लोणी घालून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment