Monday 19 September 2022

झटपट कांद्याची झणझणीत चटणी

 


झटपट कांद्याची झणझणीत चटणी

 

रोज जेवणामध्ये किंवा डब्यात जर  तेच-तेच खाऊन कंटाळला असाल तरबदल म्हणून  घरच्या घरी तयार करा कांद्याची झणझणीत चटणी

साहित्य : दोन मोठ्या आकाराचे कांदे, चवीनुसार ४-५  लाल मिरच्या, एक चमचा चिंचेची पेस्ट, चार चमचे तेल, तीन चमचे मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार.

कृती :

कांदा बारीक चिरून घ्या . एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा. त्यामध्ये कांदा चांगला भाजून घ्या. त्यात लाल मिरची टाकून भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये चिंचेची पेस्ट टाकून परतून घ्या. थंड झाल्यानंतर कांद्याचे मिश्रण बारीक वाटून घ्या. आता एका कढल्यात दोन चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, उडदाची डाळ, ५-७  मेथीचे दाणे, कढीपत्ता, हिंग आणि मीठ टाकून तडका तयार करा आणि  तो चटणीवर टाकून सर्व्ह करा.