Sunday 24 December 2023

ब्रेड रवा व पोहे यांचा मिश्र उपमा

 

ब्रेड रवा व पोहे यांचा मिश्र उपमा 


 

 

साहित्य : एक बेडचा स्लाइस, एक छोटी वाटी रवा,अर्धी मूठ जाड (कांदा-पोह्याचे) पोहे , एक कांदा (चिरून),एक टोमॅटो फोडी करून,चवीनुसार तिखट,मीठ ,चवीपुरती साखर,दोन चमचे लिंबाचा रस,कढीपत्ता,चिरलेली कोथिंबीर,फोडणीसाठी तेल व तूप,फोडणीचे साहित्य -हळद,हिंग,मोहरी,जिरे पूड,धने पूड,कढीपत्त्याची पाने.

कृती : प्रथमपोहे भिजत घालून ठेवा. नंतर  गॅसवर मंद आंचेवर एका कढईत तेल व तूप यांच्यावर रवा सोनेरी रंगावर भाजल्याचा खमंग व सुवास येईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्याच कढईत रव्याच्या चारपट पाणी गरम करायला ठेवा. त्या पाण्यात चवीनुसार तिखट व मीठ घाला. चविपुरती साखर व दोन चमचे लिंबाचा रस घाला.  पाण्याला उकळी आली की त्या कढईत पावाचा स्लाइस सोडा आणि उलथण्याने पांवाहे बारीक तुकडे कौन घोंटून  घ्या. पावाचा लगदा झाला की त्यातह भाजून हेवलेला रवा घाला  आणि कलथ्याने हलवत रंहा. रवा-पाव चांगले मिक्स झाले की भजत ठेवलेले पोहे घालून कलथ्याने हलवत मिक्स करून घ्या. काढाईवर झाकण ठेवून झाकणात पाणी घालून चांगली वाफ काढून घ्या .

दुसरीकडे गॅसवर एका काढल्यात तेल-तुपाची फोडणी करून घ्या फोडणीत हळद-हिंग,मोहरी,जिरे-धने पूड, कढीपत्त्याची पाने घालून ती तडका फोडणी कढईतील पाव-रवा-पोहे यांच्या मिश्रणावर ओता. कलथ्याने खालीवर हलवून मिक्स करून घ्या . वर चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.

तुमचा ब्रेड रवा व पोहे यांचा मिश्र उपमा सर्व्ह करायला तयार आहे.

 

Wednesday 6 December 2023

बागेसाठीआवश्यक कुंड्यांबाबत माहिती


 कुंडी : कुंडी म्हणून कुंभार वाड्यात  मिळणार्‍या मातीच्या अगर बाजारात विकत मिळणाऱ्या 

प्लास्टिकचा विविध  आकाराच्या आकर्षक कुंड्या, सिरामीकच्या आकर्षक व विविध आकारात बाजारात

 उपलब्धअसलेल्या कुंड्या,पत्र्याचे  गोल, चौकोनी आकारातील डबे,ड्रम्स,प्लास्टिकचे

 डबे,ड्रम्स,थर्मोकोलचे अगदी लहान आकारा पासून मोठ्या आकारा पर्यन्त हवे तसे मिळू शकणारे चौकोनी किंवा  आयताकृती  खोके काहीही चालू शकते.

माझ्या मते थर्मोकोलचे आपल्याला हवे त्या साईजचे आयताकृती आकाराचे खोके कुंडी म्हणून सर्वात उत्तम !

 आजकाल मेडीकलच्या डिस्ट्रिब्युटरकडून / दुकानातून असे रिकामे खोके मिळू शकतात. 

  थर्मोकोल वजनाने खूपच हलके असल्याने ज्येष्ठ व्यक्तींना या कुंड्या बागेत हाताळणे अतिशय सोपे

 जाते हे एक महत्वाचे कारण व दुसरे असे की थर्मोकोल हे पाण्याने सडत आगर कुजत नाही,किंवा

 याचेवर कसलाही रासायनिक अगदी अ‍ॅसिडचाही परिणाम होत नाही.त्याला पाण्याचा निचरा 

 होण्यासाठी ण्यासाठी भोके पाडणे सुद्धा सहज व सोपे जाते . साधा लोखंडी खिळा किंवा स्क्रू ड्रायव्हर  वापरुन भोके पाडता येतात.