Sunday 24 December 2023

ब्रेड रवा व पोहे यांचा मिश्र उपमा

 

ब्रेड रवा व पोहे यांचा मिश्र उपमा 


 

 

साहित्य : एक बेडचा स्लाइस, एक छोटी वाटी रवा,अर्धी मूठ जाड (कांदा-पोह्याचे) पोहे , एक कांदा (चिरून),एक टोमॅटो फोडी करून,चवीनुसार तिखट,मीठ ,चवीपुरती साखर,दोन चमचे लिंबाचा रस,कढीपत्ता,चिरलेली कोथिंबीर,फोडणीसाठी तेल व तूप,फोडणीचे साहित्य -हळद,हिंग,मोहरी,जिरे पूड,धने पूड,कढीपत्त्याची पाने.

कृती : प्रथमपोहे भिजत घालून ठेवा. नंतर  गॅसवर मंद आंचेवर एका कढईत तेल व तूप यांच्यावर रवा सोनेरी रंगावर भाजल्याचा खमंग व सुवास येईपर्यंत भाजून घ्या. नंतर त्याच कढईत रव्याच्या चारपट पाणी गरम करायला ठेवा. त्या पाण्यात चवीनुसार तिखट व मीठ घाला. चविपुरती साखर व दोन चमचे लिंबाचा रस घाला.  पाण्याला उकळी आली की त्या कढईत पावाचा स्लाइस सोडा आणि उलथण्याने पांवाहे बारीक तुकडे कौन घोंटून  घ्या. पावाचा लगदा झाला की त्यातह भाजून हेवलेला रवा घाला  आणि कलथ्याने हलवत रंहा. रवा-पाव चांगले मिक्स झाले की भजत ठेवलेले पोहे घालून कलथ्याने हलवत मिक्स करून घ्या. काढाईवर झाकण ठेवून झाकणात पाणी घालून चांगली वाफ काढून घ्या .

दुसरीकडे गॅसवर एका काढल्यात तेल-तुपाची फोडणी करून घ्या फोडणीत हळद-हिंग,मोहरी,जिरे-धने पूड, कढीपत्त्याची पाने घालून ती तडका फोडणी कढईतील पाव-रवा-पोहे यांच्या मिश्रणावर ओता. कलथ्याने खालीवर हलवून मिक्स करून घ्या . वर चिरलेली कोथिंबीर घालून झाकण ठेवून एक वाफ काढून घ्या.

तुमचा ब्रेड रवा व पोहे यांचा मिश्र उपमा सर्व्ह करायला तयार आहे.

 

No comments:

Post a Comment