Wednesday, 14 August 2024

शेंगदाण्याची स्वादिष्ट व कुरकुरीत भजी

 

शेंगदाण्याची कुरकुरीत भजी 

 

 






साहित्य : एक वाटी सालं काढलेले शेंगदाणे,एक छोटी वाटी बेसन पीठ,अर्धा चमचा धने-जिरे पावडर, चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा,चार लसूण पाकळ्या बारीक चिरून, चिरलेली कोथिंबीर , कढी  पत्त्याची पाने, लाल तिखट ,गोडा मसाला,चवीनुसार मीठ आणि भजी तळणीसाठी आवश्यकतेनुसार तेल.

कृती : प्रथम एका पातेल्यात सालं काढलेले शेंगदाणे, सैंधव मीठ आणि पाणी घ्या व गॅसवर शेंगदाणे मिठाच्या पाण्यात उकडून घ्या. उकडून झाले की चाळणीवर काढून निथळत ठेवा.

शेंगदाण्यातले पाणी  निघून गेले व दाणे कोरडे झाले की मिक्सरच्या भांड्यात टाका. त्यातच धने-जिरे पावडर, हिरव्या मिरचीचा ठेचा,लसूण पाकळ्यांचे बारीक चिरलेले तुकडे,मीठ, लाल टिखट ,गोडा मसाला, कढी  पत्त्याची पाने व चिरलेली कोथिंबीर आणि अर्धी वाटी पाणी  घालून मिक्सरवर वाटून घ्या.

मिक्सरवर वाटलेले शेंगदाण्याचे मसाला वाटण एका बाऊलमध्ये काढून  घ्या आणि त्यात बेसन पीठ घालून मिक्स करा. बाजयाच्या पिठासारखे बनले की  दहा मिनिटे मूरत  ठेवा.

दुसरीकडे गॅसवर एका फ्राय पॅन मध्ये भजी तळण्यासाठी तेल तापायला ठेवा.

मुरलेले शेंगदाणा भज्याचे ओले पीठ (बॅटर) एका दुधाच्या रिकाम्या प्लास्टिकच्या  पिशवीत भरून मेंदीचा असतो तसा कोन बनवा( प्लास्टिकच्या)कोनला / पिशवीला कोपऱ्यात एक बारीक छिद्र पाडा.

पॅन मधील तेल चांगले तापले असेल तर त्या तापलेल्या तेलात  या प्लॅस्टिक कोनमधून हळूहळू  दाब देऊन जिलबीचे पीठ घालतो तशी भजी सोडा आणि सोनेरी रंगावर तळून काढा.

टोमॅटो सॉस किंवा ओल्या खोबऱ्याच्या हिरव्या चटणी सोबत ही स्वादिष्ट व कुरकुरीत शेंगदाण्याची भजी सर्व्ह करा.

 

 

 

No comments:

Post a Comment