तोंडली रस्सा ग्रेव्हि पंजाबी भाजी
तोंडली रस्सा ग्रेव्हि पंजाबी भाजीचा मसाला : सूक्के गोटा खोबरं, शेंगदाणे,धने,लाल सुक्या मिरच्या,भाजलेला कांदा, कोथिंबीर आणि लसणाच्या पाकळ्या मिक्सरवर वाटुन घ्या. तोंडली चिरून ठेवा.
गॅसवर कढईत तेल गरम झाल्यावर हळद घालून चिरलेली तोंडली व मीठ घालून कढईत परतुन घ्या. दोन तीन मिनिटांनी वाटलेला काळा मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्या आणि मसाल्याचा रंग बदलेला दिसला ताजे दही घालून परतून घ्या आणि मग पाणी घालुन काढाईवर झाकण ठेवा. उकळी आली की पाच मिनिटांत तोंडली मस्त शिजलेली असतील. आता गॅस बंद करा.
No comments:
Post a Comment