Wednesday 27 February 2019

चीज शंकरपाळी

चीज शंकरपाळी


साहित्य: दोन वाट्या मैदा, एक वाटी किसलेले चीज, दोन चमचे मिक्सरवर भरड वाटलेले जिरे किंवा ओवा, दोन चमचे लाल तिखट, दोन चमचे तेल, मीठ, तळणीसाठी तेल
कृती: : प्रथम मैदा व सोडा चाळून घ्या. जिरे किंवा ओवा मिक्सरला भरड करून घ्या. मैद्यात जिरे किंवा ओवा भरड पावडर, मीठ, तिखट मिक्स करावे. तेल गरम करून ते मैद्यात घालून सगळीकडे नीट चोळावे. चीज किसून घ्यावे. तयार मैद्यात चीज नीट मिसळावे. लागेल तसे पाणी घेऊन घट्ट पीठ मळावे. अर्धा तास ओल्या सूती कपड्याखाली झाकून ठेवाव. छोटी लाटी घेऊन लाटावी आणि कातण्याने शंकरपाळे कातून घ्यावे. चांगले तापले. तेल तापत ठेवावे. की मंद आंचेवर शंकरपाळी तळून घ्यावीत.गार झाली की छान कुरकुरीत होतात.
आता मस्त एखाद्या डिप मधे बुडवून नाहीतर चहा बरोबर शंकरपाळे खा.नुसतेही छान लागतात.


लहान मुलांनाही हे शंकरपाळे खुप आवडतात.

No comments:

Post a Comment