Sunday 17 March 2019

#पिकलेल्या #केळ्याचे #सांदण


साहित्य : दोन वाट्या इडली रवा,एक वाटी पिकलेल्या केल्याचा गर,एक वाटी साजूक तूप,एक वाटी गूळ, एक वाटी खोवलेला ओल्या नारळाचा चव व एक छोटा चमचा वेलची पावडर,चवीपुरते मीठ.
कृती : प्रथम गॅसवर एका पॅनमध्ये साजूक तुपावर इडली रवा खमंग सुवास येपर्यंत भाजून घ्या ,मग त्यात एक वाटी पिकल्या केळ्याचा गर ,एक वाटी पातळ केलेला गूळ, एक वाटी खोवलेला ओल्या नारळाचा चव हे सगळे घालून
सर्व मिक्स करा ,थोडे मीठ घाला,
आणि पाणी घालून चव बघा गोड चव पाहिजे तर आणखी गूळ घाला आणि ,वेलची पावडर घाला आणि इडलीच्या पिठापेक्षा पेक्षा थोडे सरसरीत करा आणि तूप लावलेली थाळी घेवून त्यात पातळ थर पसरा आणि अर्धा तास इडली प्रमाणे वाफेवर शिजवा
सुरीने थाळी ची बाजू मोकळी करून थाळी उलटी ठोका
सांदण सुटून येईल
सांदण नारळाच्या गोड दुधा बरोबर सर्व्ह करा.

No comments:

Post a Comment