टोमॅटोचे आमलेट
साहित्य : एक
मोठ्ठा टोमॅटो,एक मोठ्ठा कांदा,कोथिंबीर,हिरव्या मिरच्या,जिरे-धने
पावडर,चवीपुरती साखर व मीठ आवश्यक तेव्हढे बेसन (चणा डाळ)
पीठ , २-३ चमचे तांदळाचे
पीठ व तेल.
कृती : प्रथम टोमॅटो ,कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्या,चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्या. एका पातेल्यात बेसन पीठ,तांदळाचे पीठ घ्या,त्यात बारीक चिरलेले टोमॅटो,कांदे व कोथिंबीर , हिरव्या मिरचयांचे तुकडे,जिरे-धने पावडर चवीनुसार साखर आणि मीठ घालून सरबरीत होईल इतपत पाणी घाला व
मिश्रण डावाने चांगले एकजीव करून घ्या. गॅसवर तवा ठेऊन चांगला तापल्यावर त्यावर
ओला कापलेला कांदा फिरवून घ्या व नंतर चमचाभर तेल टाकून त्यावर डावाने आमलेट टाका.
थोड्या वेळाने उलटे करून दुसर्या बाजूने तयार करून घेऊन टोमॅटो सॉस बरोबर गरम
आमलेटसर्व्ह करा
No comments:
Post a Comment