साहित्य : ताजी लालबूंद कोवळी गाजरे १ किलो,दूध १ लीटर,ताजा खवा ५०० ग्राम,साखर ५०० ग्राम,वेलदोडयाची पूड १ चमचा,अमूल दुधाची पावडर १०० ग्राम,काजू-बदाम-बेदाणे-प्रत्येकी २५ ग्राम व साजूक तूप २ चमचे
कृती : प्रथम गाजरे
स्वच्छ धुवून व पुसून किसणीवर त्यांचा कीस काढून घ्या.आता एका जाड बुडाच्या मोठ्या
पातेल्यात २ चमचे साजूक तूप घालून गाजराचा कीस पूर्ण कोरडा होईपर्यंत परतून
घ्या.मग त्यात आधी खरपूस परतून घेतलेला खवा घाला व दोन्ही चांगले एकजीव झाल्यावर
अमूलची दूध पावडर,दूध,साखर व वेलदोडयाची पावडर घाला व मंद आचेवर शिजायला ठेवा.शिजून हलवा घट्ट
होऊ लागल्यावर गॅस बंद करून त्यात बारीक तुकडे केलेली ड्राय फ्रूट्स (काजू,बदाम,बेदाणे इ.) घालून हलवा व एका काचेच्या
बाउलमध्ये काढून घेऊन सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा.
सर्व्ह करतेवेळी
वरुन थोडे ड्राय फ्रूटचे तुकडे घालून द्या.
No comments:
Post a Comment