साहित्य : १ वाटी
चाळलेला मैदा , १ वाटी चाळलेली कणीक , १वाटी
दूध , १/२ वाटी पाणी , १/२ वाटी लोणी , १/२ वाटी साखर , ३-४ मोठे चमचे तांदळाची पिठी , चिमूटभर खाण्याचा सोडा व चिमूटभर मीठ , तळण्यासाठी
रिफाईंड तेल
कृती : एका
भांड्यात १वाटी दूध व १/२ वाटी पाणी एकत्र करून मिश्रण चांगले ढवळा व बाजूला
ठेवा.
१/२ वाटी
लोणी व १/२ वाटी साखर एकत्र करून मिश्रण चांगले फेटून घ्या ते हलके व फुगल्यावर त्यात
चिमूटभर खाण्याचा सोडा व चिमूटभर मीठ घालून पुन्हा एकदा चांगले फेटून घ्या व नंतर
त्यात १ वाटी चाळलेला मैदा , १ वाटी चाळलेली कणीक , ३-४ मोठे चमचे तांदळाची पिठी व एकत्र केलेले दूध व पाणी घाला व चांगले
मळून घ्या.
त्याचे सारख्या आकाराचे ३-४ गोळे करून ठेवा व नंतर
एकेक गोळा जाडसर पोळीप्रमाणे लाटून कातण्याने शंकरपाळी कापून घ्या व ती शंकरपाळी
उकलत्या तेलात/तुपात सोनेरी रंगावर तळून घ्या. गार झाल्यावर घट्ट झाकणाच्या
स्टीलच्या डब्यात भरून ठेवा.
No comments:
Post a Comment