साहित्य : २ वाट्या उकडे तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ, १ मोठा कांदा बारीक चिरून , १ मोठा आल्याचा तुकडा बारीक चिरून,
आवडीनुसार ३ -४ हिरव्या मिरच्या बारीक चिरून, मीठ
चवीनुसार,
फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग व बारीक चिरलेला कढीपत्ता
कृती : प्रथम २
वाट्या उकडे तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ वेगवेगळे १०-१२ तास भिजवणे. मग दोन्ही
वेगवेगळे वाटून स्टीलच्या
मोठ्या पातेल्यात एकत्र करून उबदार
ठिकाणी पीठ फुगण्यासाठी / आंबवण्यासाठी १०-१२ तास झाकून ठेवावे.
दुसरे दिवशी तयार इडली
पीठात बारीक चिरलेला
कांदा, आले, हिरवी मिरची
व चवीनुसार मीठ घालावे.` एका काढलीत तेल तापवून
मोहरी, हिंग व कढीपत्त्याची फोडणी करावी व ती पीठावर ओतून मिश्रण नीट
एकजीव करावे.निर्लेपचे आप्पेपात्र
मध्यम आचेवर गॅसवर ठेवून
त्यात १/२ चमचा तेल घालावे. तेल तापले की त्यात चमच्याने मिश्रण
घालावे. झाकण ठेऊन २ मिनिटे शिजू द्यावे. एका बाजूने शिजून फुगले की उलटवून दुसर्या बाजूने शिजू द्यावे. तयार आप्पे ओल्या नारळाच्या चटणीबरोबर सर्व्ह करावे.
No comments:
Post a Comment