Monday 31 May 2021

नीर डोसा

 

नीर डोसा

  



 

कानडीत पाण्याला नीर असे म्हणतात. रात्रभर पाण्यात भिजत घातलेला तांदूळ पाण्यासाकट मिक्सरवर छान बारीक वाटून घेऊन त्या पिठाचा केलेला डोसा म्हणजेच नीर डोसा होय.

करायला एकदम सोप्पा..

साहित्य : एक वाटी इंद्रायणी तांदूळ (उकड्या नको) ,एक टेबलस्पून उडदाची डाळ, १०-१२ मेथी दाणे , मूठभर जाड पोहे , मठभर ओल्या नारळाचा चव ,अडीच वाट्या पाणी , एक चमचा मीठ ,चवीनुसार हिरवी मिरची

कृती : आदल्या रात्री तांदूळ, उडदाची डाळ, मेथी दाणे , जाड पोहे  अडीच वाट्या पाण्यात भिजत घालावेत. सकाळी पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यावे . हे झाले आपले नीर डोशाचे पीठ तय्यार  !

लगेच त्यात एक  चमचा मिठ व चवीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा व बॅटर मिक्स करून ठेवायचे.

दुसरीकडे गॅसवर  बिडाच्या तव्याला योग्य तापवून,त्यावर थोड़े तेल घालून हे पातळ बनावलेले बॅटर डावाने गोलाकार पसरून टाकावे ...

आणि नारळाच्या चटणी बरोबर हे नीर डोसे सर्व्ह करावेत.


विशेष सूचना : हे नीर डोशाचे बॅटर पातळच  हवे..आणि तवा फिरवून  हे बॅटर डोश्यासारखे गोल करायचे..जेवढे बॅटर पाण्यासारखे पातळ ...डोसा जाळीदार आणि लुसलुषित होणार!

या नीर डोश्याला  fermentation करत नहीत...ग्राइंड केले की लगेच डोसा करायचा.. 

No comments:

Post a Comment