मिश्र पालेभाज्यांच्या खुखुशीत पुर्या
कृती : आपला नेहमीचा मिक्सर जार घ्या , त्याला आतिल बाजूने तेल लावा आणि जार मध्ये थोडेसे तेल घाला म्हणजे
पीठ जारला आतून चिकटत नाही.
मग त्या जार मध्ये अर्धा जार भरेल
एवढी कणिक (गव्हाचं पीठ) घाला.
आलं लसूण पेस्ट, मीठ, धना जीरा पावडर, मिरची पावडर किंवा हिरव्या मिरचीचे
तुकडे आणि बारिक चिरलेली केणा ,पालक,मेथी, शेपू,रताळी,शेवगा या
पालेभाज्यांची पाने (इतर
पालेभाज्या उदा. मायाळू,हादगा,मुळे ,मोहरी यांचीही बारीक चिरलेली पाने
घातली तरी चालतील) व सोबत कढीपत्ता आणि कोथिंबीर
यांचीही पाने बारीक चिरून टाका,
वरून थोडे तीळ टाका.
आता अगदी थोडे थोडे पाणी घालत whipping mode वर मिक्सर फिरवत
पांच-सहा मिनिटे पीठ मिक्स करायचे, सुरेख मऊ असे पीठ मळून तयार
होते.
आता मिक्सरमधून पिठाचा गोळा बाहेर परतीत
किवा तसरळ्यांत काढून घ्या व तेलाचा हात लावून परत मळून घ्या. पण पाणी अगदी
थोडे थोडे घालायचे.
पीठ दहा मिनिटे मुरल्यावर लिंबा एव्हढे उंडे करूनपोळपाटावर पुर्या लाटून ठेवा.
दुसरीकदे गॅसवर एका कढईत तेल गरम करा. तेल
चागले तापले की त्यात पुर्या टाळून काढा.
नाश्ता म्हणून लोणी किंवा दह्या सोबत खुसखुशीत
, आरोग्यदायी आणि पौष्टिक
पुर्या सर्व्ह करा.
दुपारच्या चहा सोबत चाऊ-म्याऊ म्हणूनही
देता येतात.
टीप :
शेवटी मिक्सर च्या भांड्यात पाणी आणि भांडी धुण्याचा द्रवरूप साबण घालून एकदा
फिरवून घ्यायचे म्हणजे मिक्सर परत चकाचक...
No comments:
Post a Comment