Wednesday 5 May 2021

भेंडीचा चटकदार चटका

 

भेंडीचा चटकदार चटका




साहित्य : ७-८ ताज्या कोवळ्या भेंड्या,अर्धी वाटी मलईचे  दही, चवीनुसार लाल तिखट,मीठ,चाट मसाला,जिरे-धने पूड,सैंधव मीठ,पादेलोण,चमचाभर तीळ व शेंगदाण्याचे कूट आणि तेल.

कृती : ताज्या कोवळ्या भेंड्यांच्या पातळ चकत्या / काप चिरून घ्या. एका पसरट बाऊलमध्ये मलईचे दही घेऊन त्यात चवीनुसार लाल मिरचीचे तिखट ,मीठ, चाट मसाला,जिरे-धने पूड,सैंधव मीठ,पादेलोण घालून मिक्स करा. आता त्यात भेंडीचे काप घालून त्याला सगळीकडून ते मसाला दही लावून मुरत ठेवा व नंतर २-३ दिवस कडक उन्हात वाळवा.

चांगले वाळले की गॅसवर एका कढल्यात तेलाची फोडणी करून त्यात हे वाळलेले भेंडीचे मसाला दह्यात मॅरिनेट करौन वाळवलेले काप घाला. त्यात आता तीळ आणि शेंडाण्याचे कूट व चविसाठी साखर घाऊन शॅलो फ्राय करा. छान कुरकुरीत चटका झाला की गॅस बंद करा.

तोंडीलावणे म्हणून हा भेंडीचा चटकदार चटका खूपच छान लागतो.

No comments:

Post a Comment