Search This Blog

Thursday, 27 May 2021

इन्स्टंट खमण ढोकळा मिक्स आणि इन्स्टंट खमण ढोकळा मिक्स रेसिपी


 इन्स्टंट खमण ढोकळा मिक्स कसे बनवायचे त्याची रेसिपी आणि ते वापरुन खमण ढोकळा कसा बनवायचा त्याचीही रेसिपी.

साहित्य : एक वाटीभर तांदुळ,तांदुळाच्या निम्मी म्हणजेच अर्धा वाटी हरबर्याची (चणा डाळ),चणा डाळीच्या निम्मी म्हणजेच पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी साखर,एक टेबलस्पून मीठ,एक टेबलस्पून खाण्याचा सोडा,ढोकळ्याला आंबटपणा येण्यासाठी व टिकाऊपणा (Preservative) यावा म्हणून एक टेबलस्पून सायट्रीक अँसिड. १ टेस्पून
कृती : आगोदर तांदुळ व दोन्ही (हरबरा व उडीद) डाळी धुवून आणि सूती पंचावर पसरून सावलीत खडखडीत वाळवून घ्याव्यात. मग हे तिन्ही घटक (तांदूळ व दोन्ही डाळी) एकत्र करून मिक्सरवर वाटून त्यांची पावडर (पीठ) करून घ्यावी.नंतर मिक्सरवर मीठ, साखर, सोडा व सायट्रीक अँसिड हे बाकीचे घटक एकत्र करून मिक्सरमधे फिरवून मिक्स करून घ्या.त्यांची बारीक पावडर करा.
आता या मिक्सरवर तयार करून घेतलेल्या दोन्ही पावडरी एकत्र करून पुन्हा एकदा हलकेच मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
तयार झालेले इन्स्टंर खमण ढोकळा मिक्सएखाद्या घट्ट झाकणाच्या हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवावे. हे इन्स्टंट मिक्स साधारणत: एक महीन्यापर्यंत छान टिकते. गरजेनुसार हे इन्स्टंट मिक्स वापरुन ढोकळा बनवावा.
टीप : तांदूळ व दोन्ही डाळी आणि इतर घटक पदार्थ म्हणजे मीठ, सोडा, साखर,सायट्रीक अँसिड हे वर सांगितल्याप्रमाणे मिक्सरमधून स्वतंत्रपणे वेगवेगळेच बारीक करावे, अन्यथा पीठात गुठळ्या होऊ शकतात.
ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य : एक वाटी इन्स्टंट ढोकळा मिक्स (गरजेनुसार दिलेल्या प्रमाणांत कमी-जास्त करा),एक वाटी (जितके इन्स्टंट पीठ तेव्हढेच) पाणी, चिमुटभर हळद,एक चमचा हिरवी मिरची व ,आलं यांची पेस्ट,फोडणीसाठी तेल,हिंग,मोहरी,पांढरे तिळ, ८-१० कढीपत्त्याची पाने, सजावटीसाठी चिरलेली ताजी कोथिंबीर.
इन्स्टंट ढोकळा बनवण्याची कृती :
प्रथम खमण ढोकळा बनवण्याच्या कुकरमधे तळाशी गरजेइतके पाणी घालून ते गॅसवर गरम करण्यास ठेवावे. ढोकळा पात्राला आतून तेलाचा हात लावून घ्यावा.
आता एका बाऊलमधे इन्स्टंट ढकला मिक्स घेऊन त्यामधे हळद व हिरवीमिरची आणि आलं यांची पेस्ट घालावी व गुठळ्या होणार नाहीत याची दक्षता घेत गरम पाणी घालून ढवळावे. आता हे तयार मिश्रण झटपट ढोकळा पात्रात ओतून, ढोकळा स्टँड कुकरमधे ठेवावे व गॅसवर पंधरा मिनिट वाफवून घ्यावे.
दुसरीकडे (ढोकळा वाफेपर्यंत) गॅसवर एका काढल्यात फोडणी तयार करून ठेवावी. ढोकळा वाफून तयार झाला की, थोडा थंड झाल्यावर एका थाळीत काढावा, त्यावर फोडणी चमच्याने पसररावी व वरून चिरलेली ताजी कोथिंबीर घालून सुरीला तेलाचा हात लावून कापून ढोकळा चटणीसोबत खायला द्या.
टिप्स :
खमण ढोकळा जर प्रेशर कुकर मधे करणार असाल तर ढोकळा करण्यापूर्वी कुकरच्या झाकणाची रबरी रींग व शिट्टी काढून ठेवा.

No comments:

Post a Comment