Thursday 6 May 2021

सुक्या खोबर्‍याची चटणी

 सुक्या खोबर्याची चटणी



साहित्य : अर्धे बक्कल गोटा सुके खोबर्याची वाटी,मूठभर शेंगदाणे,४-५ लसणाच्या पाकळ्या,अर्धा इंच आल्याचा तुकडा,८-१० कढीपत्त्याची पाने,चवीनुसार कैरीच्या फोडी,एक चमचा साखर, अर्धा चमचा मीठ,चवीनुसार ४-५ हिरव्या मिरच्या,जरुरीपुरते पाणी.
कृती : मिक्सरच्या ग्राइंडरच्या भांड्यात सुक्या खोबर्याचे तुकडे,शेंगदाणे,आल्याचा तुकडा,लसणाच्या पाकळ्या, कढीपत्त्याची पाने,कैरीच्या फोडी, चवीनुसार हिरव्या मिर्च्यांचे तुकडे, साखर ,मीठ व गरजेनुसार पाणी घालून चटणी वाटून घ्या.
जेवणात डावीकडील तोंडीलावणे म्हणून ही चटकदार चटणी पोळी,चपाती,भाकरी किंवा भातासोबत वाढा,छान लागते.
प्रमोद तांबे.

No comments:

Post a Comment