मिश्र पालेभाज्यांचे आरोग्यदायी ठेपले...
कृती : आपला नेहमीचा मिक्सर जार घ्या ,
त्याला आतून तेल लावा आणि जार मध्ये थोडेसे तेल घाला म्हणजे पीठ जारला आतून चिकटत
नाही मग अर्धा जार भरेल एवढी कणिक (गव्हाचं
पीठ) घाला. आलं लसूण पेस्ट, मीठ, धना जीरा पावडर, मिरची पावडर आणि बारिक चिरलेली केणा ,पालक,मेथी,शेपू,रताळी,शेवगा या पालेभाज्यांची
पाने (इतर पालेभाज्या उदा. मायाळू,हादगा,मुळे
,मोहरी यांचीही बारीक चिरलेली पाने घातली तरी चालतील) व सोबत कढीपत्ता आणि कोथिंबीर यांचीही पाने बारीक चिरून टाका, वरून थोडे तीळ टाका.
आता अगदी थोडे थोडे पाणी घालत whipping mode वर मिक्सर फिरवत पांच-सहा
मिनिटे पीठ मिक्स करायचे, सुरेख मऊ असे पीठ मळून होते.
टीप : शेवटी मिक्सर च्या भांड्यात पाणी आणि भांडी धुण्याचा
द्रवरूप साबण घालून एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे मिक्सर परत चकाचक...
No comments:
Post a Comment