मॅँगो मस्तानी
साहित्य : तीन मोठे हापूसचे आंबे,अर्धा लीटर पूर्ण स्निग्धांश असलेले निरसे चिल्ड दूध,एक वाटी साखर, प्रत्येकी ८-१० पिसत्यांचे काप,काजू पाकळ्यांचे काप,बदामांचे काप,८-१० स्कूप (आईसक्रीमचा चमचा) मॅँगो किंवा व्हॅनीला आईस्क्रीम,सजावटीसाठी ८-१० लालचुटुक चेरी ,८-१० आईसक्युब्ज
कृती : ४-५ लालचुटुक चेरी आणि थोडे पिस्ते,बदाम व काजूचे काप बाजूला काढून ठेवा.
हापूसचे आंबे सोलुंत्यांच्या फोडी करून घ्या.
त्यातील ५-७ फोडी बाजूला काढून ठेवा आणि उरलेल्या फोडी मिक्सरच्या ब्लेंडरच्या
भांड्यात घाला. मग त्यात साखर आणि पूर्ण स्निग्धांश असलेले निरसे चिल्ड दूध घालून
ब्लेंड करा व घट्ट मिल्क शेक बनवून घ्या. चव बघा आणि हवी असेल तर आणखी साखर घालून
मिक्स करा.
आता हे घट्ट मिल्क शेक सर्व्हिंग ग्लासेसमध्ये
काढून घ्या वर २” जागा ठेवा.
त्या मोकळ्या भागात दोन स्कूप आईस्क्रीम घाला.
वर पिस्ते,बदाम व काजचे काप घालून सजावट करा.
त्यावर दोन लालचुटुक चेरी ठेवा आणि ग्लासमध्ये स्ट्रॉ घालून आंबा मस्तानी सर्व्ह
करा.
No comments:
Post a Comment