भरताच्या वांग्याचे पोहे
साहित्य : दोन वाट्या
जाड पोहे , पाऊण वाटी उकडवून /भाजून सोललेल्या वांग्याचा गर ,
दोन मध्यम कांदे बारीक चिरून
फोडणीसाठी साहित्य : एक चमचा तेल, एक छोटा चमचा मोहोरी, चिमूटभर हिंग, एक छोटा हमचा हळद , एक चमचा हिरव्या मिरचीचा ठेचा, दोन चमचे लिंबाचा रस,एक चमचा साखर,चवीनुसार मीठ,अर्धी मूठ कोथिंबीर ,अर्धी मूठ ओल्या नारळाचा
चव,मूठभर बारीक शेव
कृती : आगोदर गॅसवर एका कढईत जाड पोहे
चांगले भाजून घ्यावेत,एकदम कुरकुरीत
झाले पाहिजेत. भाजलेले पोहे परातीत काढून घ्या , नंतर त्यावर
बारीक चिरलेला कांदा, लिंबाचा रस, मिरचीचा
ठेचा , बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार
मीठ , साखर आणि वांग्याचा गर घालावा व मिश्रण चमच्याने ढवळून
घ्यावे. शेवटी एका लहान कढल्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात क्रमाने
मोहोरी, हिंग आणि हळद घालून फोडणी करून घेऊन ती तयार फोडणी या
कालवलेल्या वांगी-पोहयांच्या मिश्रणावर वर
घालून हाताने कालवून पोहे झकास मिक्स करावेत.सर्व्हिंग डिशमध्ये पोहे काढल्यावर त्यावर
सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर ,ओल्या नारळाचा चव घालून आणि
बारीक शेव भुरभुरून हे वांगी पोहे लगेच खायला द्यावेत.
No comments:
Post a Comment