पौष्टिक आंबोशी घाऱ्या
हा प्रकार तसा जुनाच आहे.
रात्रीचा भात पण उपयोगी येतो, वाया जात नाही आणि एक नवीन डिश केल्याचा आनंद पण वाटतो.
साहित्य : एक वाटी रात्रीचा भात,अर्धी वाटी
कणिक , अर्धी वाटी बेसन पीठ,अर्धी वाटी ज्वारीच पीठ, एक उकडलेला बटाटा. पालक,मेथी,रताळी,केणा,पपई,मोहरी,शेवगा,हादगा
यांच्या पानांची प्युरी ,चवीनुसार तिखट व मीठ, हळद,कोथिबींर धने पुड,एक चमचा तीळ,ओवा,पाव वाटी दही/ताक
कृती : दही/ताक,कोथिंबीर सोडून वरील सर्व साहित्य
मिक्सर मधून काढून घ्या. मिक्सर थोडंच फिरवायच व एका भांड्यात काढून दही आंबट असेल
तर एक चमचा टाकून मिश्रण रात्रभर राहु द्या.दुसऱ्या दिवशी विविध पानांची प्युरी व उकडलेल्या
बटाट्याचा मॅश केलेला लगदा आणि कोथिंबीर घालून पुरी प्रमाणे तळुन घ्या.
चटणी किंवा टोमॅटो साॅस सोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment