दुधीचे वडे
खास विदर्भीय पध्दतीचे लौकीचे वडे बनवण्या करता प्रथम एक दुधी किसणीने किसून व घट्ट पिळून त्यातील पाणी काढून टाका व मग त्यात हिरवी मिरची ,जिरे,दोन चमचे पांढरे तीळ,एक चमचा ओवा यांचे वाटण करून घाला ,नंतर त्यात थोडीची हळद,बारीक चिरलेला कढीपत्ता , कोथिंबीर आणि मेथीची पाने व अर्धा चमचा साखर घालून व्यवस्थित मिक्स करून घ्या . आता त्यात मावेल तेव्हढेच तांदुळाचे पीठ घालून वडे बनवता येतील असे घट्ट पीठ बनवा.प्लास्टिकचा पेपर किंवा कॉटनच्या ओल्या कापडावर वडे थापून गरम तेलात खमंग टाळून काढा.गरमागरम खुसखुशित दुधीचे वडे तयार.
No comments:
Post a Comment