कोयाडं
(पिकलेल्या आंब्यांपासून बनवला जाणारा चविष्ट खास उन्हाळी स्पेशल-प्रकार)
साहित्य : १०-१२
छोटे छोटे पिकलेले आंबे,फोडणीसाठी : दोन टेबालस्पून तेल,४-५ लाल सुक्या
मिरव्हया,अर्धा चमचा मेथीचे दाणे,एक चमचा मोहरी,एक छोटा चमचा जिरे,एक छोटा चमचा हळद,एक छोटा चमचा हिंग,दोन वाट्या गूळ, एक छोटा चमचा मीठ.
कृती : प्रथम
प्रेशर कुकरमधून आंबे सालासकट दोन तीन शिट्यावर उकडून घ्या. कुकरचे प्रेशर कमी
झाल्यावर आंबे बाहेर काढून सोलून ठेवा.
दुसरीकदे गॅसवर एक
पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन त्यात जिरे व मोहरी घालून दोन्ही चांगली
तडतडल्यावर त्यात मेथीचे दाणे घाला व ब्राऊन रंगावर परतून घ्या आणि मग त्या फोडणीत
लाल सुक्या मिरच्या,हिंग व हळद घालून एखादे मिनिट परतून घ्यावं नंतर त्यात उकडून साले
काढलेले आंबे घाला. चवीनुसार मीठ व भरपूर गूळ घालून तो पूर्ण विरघळल्यावर एखादी
उकळी काढून गॅस बंद करा.
टीप : यांत नारळाचे
दूध वापरल्यास चव अजूनही खूपच छान लागते.
No comments:
Post a Comment