Search This Blog

Saturday, 31 March 2018

कढी पकोडा

कढी पकोडा


साहित्य  : पकोड्यांसाठी : दोन वाट्या बेसन पीठ,चवीनुसार ४-५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,एक लहान चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ ,मोहन म्हणून दोन टेबलस्पून तेल,पकोडे तळण्यासाठी गरजेनुसार वेगळं तेल.
कढीसाठी साहित्य  : ५-६ कप आंबट दही,५-६ त्बलस्पून बेसन पीठ,फोडणीसाठी एक चमचा तेल,एक छोटा चमचा मोहरी,अर्धा छोटा चमचा हळदपूड,एक छोटा चमचा जिरे,एक चमचा आले-हिरवी मिरची यांची पेस्ट,चिमूटभर हिंग,चवीनुसार साखर व मीठ.
कढीला वरून द्यायच्या फोडणीसाठी : एक चमचा चमचा तेल,दोन अख्ख्या सुक्या लाल मिरच्या.
कृती : कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन व पाणी घालून हॅण्ड मिक्सरने (ब्लेंडरने) एकजीव करुन घ्या.
आता गॅसवर एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये जिरे,मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं-हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि हळद घाला.
मग दही-बेसनाचं मिश्रण आणि मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्रण उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
दुसरीकदे पकोड्यांसाठी बेसनमध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा आणि ते व्यवस्थित फेटा.
नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा, लाल तिखट, मीठ आणि गरम तेल घाला. पुन्हा एकवार फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तळून ठेवा.
शिजलेल्या कढीमध्ये हे पकोडे टाका आणि ५ मिनिटं आणखी मंद आचेवर शिजू द्या. यानंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये कढी ओता.
आता गॅसवर एका कढल्यामध्ये कढीला वरून द्यायच्या फोडणीसाठी एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालून एक मिनिट परता आणि ही फोडणी कढीवर ओता. वरून फोडणी घातल्यानंतर या पदार्थाला एक वेगळंच रूप मिळतं व अङ्कोखा आस्वादही येतो.


No comments:

Post a Comment