कैरीचा भात
साहित्य : एक वाटी
कैरीचा कीस,दोन वाट्या भात,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्या,७-८ कढीपत्त्याची
पाने,एक टेबलस्पून तीळ,एक चमचा मोहरी,एक चमचा उडीद डाळ,चिमूटभर हिंग,चवीनुसार मीठ,चिमूटभर हळद.
कृती : साला सकट कैरी
किसून ठेवा. हिरव्या मिरच्या बारीक चिरून ठेवा. शिजलेला भात एका परातीत काढून
हाताने मोकळा करून ठेवा.
गॅसवर एका पॅनमध्ये
तेल गरम करा. तेल चांगले गरम झाल्यावर त्यात मोहरी टाका. मोहरी तडतडली की त्यातच
उडीद डाळ टाकून ती गोल्डन ब्राऊन रंगावर परता. मग त्यात तीळ, हिंग, कढीपत्त्याची पाने,बारीक चिरलेल्या
हिरव्या मिरच्या,आणि कैरीचा कीस घालून परता. नंतर त्यात चिमूटभर हळद घाला.(हळद खूपच
थोडी घाला,फक्त कैरीच्या किसाला छान सोनेरी रंग यावा एव्हढीच) दोन-तीन मिनिटे
परता.कैरी शिजून थोडी मऊ झाली की गॅस बंद करा.
आता त्यात चवीनुसार
मीठ व शिजलेला व मोकळा करून ठेवलेला भात
घालून झार्याने हलवून मिक्स करा.
आपल्याला आवडत्या
कोणत्याही लोणच्या सोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment