मसाला सुपारी
साहित्य : आदपाव
(१२५ ग्राम) बर्डी (लाल) सुपारी,अर्धा
किलो हिरवी बडीशेप,पाव किलोभाजलेली धने डाळ ,७५ ग्राम
ज्येष्ठमध पावडर,५० ग्राम हिरवी गुंज पत्ती,५ ग्राम प्रत्येकी लवंगा,दालचीनी व वेलदोडे यांच्या
ग्राईंड केलेल्या पावडरी ,पाऊण टेबलस्पून सैंधव मीठ, पाऊण टेबलस्पून काळे मीठ,१२५ ग्राम साजूक तूप,पाव छोटा डबा काश्मिरी सुगंधी
पावडर.
कृती : बर्डी सुपारी
बारीक कातरून ठेवा. गुंजपत्ती स्वच्छा करून घ्या. हिरवी बडिशोप मंद आंचेवर भाजून
घ्या आणि सुपारीचे इतर मसाल्याचे घटक जिन्नस सुद्धा असेच मंद भाजून घ्या. थंड
झाल्यावर बडीचेप मिक्सरवर रवाळ ग्राइंड करून घ्या.
आता गॅसवर एका
मोठ्या पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात कातरून ठेवलेली सुपारी मंद आंचेवर ब्राऊन
रंगावर व तळल्याचा मंद सुवास येईपर्यंत तळून काढा. थंड झाल्यावर या टाळून
घेतलेल्या सुपारीत भाजून ग्राइंड लेलेली बडिशोप व इतर सर्व मसाल्याचे मंद आंचेवर
भाऊ घेतलेले घटक पदार्थ (पावडरी) मिक्स
करून हाताने कालवून घ्या,किंवा
चमच्याने खालीवर करत मिक्स करून घ्या. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून
ठेवा.
जेवणानंतर एक छोटा
चमचा भर मसाला सुपारी मुख शुद्धी म्हणून खात जावी.यातील मसाल्यांमुळे अन्न पचनास मदत होते व मुखाला दुर्गंधी
येण्यापासून बचाव करते.
No comments:
Post a Comment