Search This Blog

Friday, 23 March 2018

कणकेच्या खुसखुशीत वड्या




साहित्य :  चार वाट्या कणीक (गव्हाचे पीठ) ,दीड  ते दोन वाट्या (आवडीनुसार कमी-जास्त) किसलेला पिवळा जर्द कोल्हापुरी गूळ, दोन वाट्या साजूक तूप,दोन टेबलस्पून तीळ,काजू, अर्धी बदाम,पिस्ते इ. ड्राय फ्रूट्सचे काप,अर्धी मूठ बेदाणे ,एक छोटा चमचा वेलदोडयाची अथवा जायफळाची पूड,पाव कप दूध, ३-४ केशराच्या काड्या (कोमट दुधात खलून घ्याव्यात)
कृती:  सुरवातीला साजूक तुपावर कणीक खंमग घ्यावी, कणीक भाजून होत आल्यावर त्यातच तीळ घालून थोडे भाजून घ्यावे.कणीक खरपूस भाजून जराशी लालसर झाली की त्यावर दूधाचा हबका मारावा आणि लगेच त्या  किसलेला गूळ टाकुन दोन मिनिटे परतून घेतल्यावर त्यात काजु, पिस्ते , बदाम इ. ड्राय फ्रूट्सचे काप,बेदाणे , वेलदोडयाची अथवा जायफळाची पूड, दुधात खललेल्या केशराच्या काड्या  घालुन एका तूपाचा हात लावलेल्या थाळित थापाव्या आणि साधारण गार झाल्यावर वड्या कापाव्या
टीप : खरपुस भाजलेल्या कणकीवर दुधाचा हबका मारल्याने कणकेला छान जाळी पडते आणि वडी खाताना कणीक चिकट लागत नाही.


No comments:

Post a Comment