गावरान गवारीची भाजी
साहित्य : गावरान बुटकी गवार- पाव किलो,पाव चमचा ओवा,एक चमचा लाल तिखट ,अर्धी वाटी दूध , चवीनुसार मीठ आणि गूळ ,तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद व एक छोटा चमचा मोहरी , मूठभर कोथिंबीर
कृती : गावराण बुटक्या गवारीचे देठ व शिरा काढून अख्खी गवार पाण्यात
शिजवून घ्यावी.
गॅसवर एका पॅनमध्ये तेलाची फोडणी करून
त्यात हिंग , मोहरी, हळद व ओवा घालून शिजलेली गवार फोडणीत घालावी.
शिजत असतांनाच गवारीवर अर्धा वाटी दूध व
लाल तिखट घालावे. भाजी शिजत आली की चवीनुसार मीठ, गूळ घालावा. गूळ विरघळून भाजी शिजली की चिरलेली कोथिंबीर
घालावी.
No comments:
Post a Comment