साहित्य : एक दोडका,एक सिमला मिरची ,एक टोमॅटो,एक कांदा,दोन हिरव्या
मिरच्या,दोन सुक्या लाल मिरच्या,चिंचेचे बुटुक,चमचाभर तेल. मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,एक चमचा लिंबाचा रस,चवीनुसार मीठ.
कृती : दोडका व
सिमला मिरचीच्या चकत्या चिरून घ्या. कांदा व टोमॅटो बारीक चिरून ठेवा.
गॅसवर एका पॅन मध्ये
तेल गरम करून घेऊन त्यात प्रथण कांदा सोनेरी
रंगावर परतून घ्या व त्यानंतर त्यात बारीक चिरलेला टोमॅटो व मिरच्या
(दोन्ही प्रकारच्या हिरव्या व सुक्या लाल) घालून परतून/शिजवून घ्या.
आता त्यात सिमला
मिरचीच्या चकत्या घालून परता. ४-५ मिनिटे मिरच्या परतल्यावर शेवटी त्यात
दोडक्याच्या चकत्या,बारीक चिरलेली कोथिंबीर व
चवीनुसार मीठ घालून शिजून मऊ होईपपर्यंत परता. आता त्यात चिंच घालाव एक मिनिट
परतून गॅस बंद करा.
थंड झाल्यावर हे
सगळे मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये घालून चटणी वाटून घ्या. तुम्हाला आवडत असेल तर
तुम्ही या चटणीवर हिंग, मोहरी व कढी पत्त्याची तडका फोडणी घालू शकता.
No comments:
Post a Comment