वरीचे तांदूळ ,कच्चा बटाटा,रताळे,काकडी,साबुदाणा यांचे उपासाचे मिश्र थालीपीठ
(खास महाशिवरात्रीसाठी)
साहित्य : एक वाटी वरीचे तांदूळ (भगर),एक (मध्यम) बटाटा ,एक काकडी,मूठभर भिजवलेला साबुदाणा,एक चमचा जिरे,चवीनुसार मीठ व हिरवी मिरची,थालीपीठ लावण्यासाठी तेल
किंवा तूप,आणि ज्यांना उपासाला चालते त्यांच्यासाठी एक टेबलस्पून
बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : दोन तास आगोदर साबुदाणा भिजत घालून ठेवा.
कच्चा बटाटा,रताळे व काकडी (साले काढून) स्वतंत्रपणे
किसणीवर किसून ठेवा. वरीचे तांदूळ(भगर)तुपावर भाजून घेऊन त्यात चवीनुसार मीठ,हिरवी मिरची व जिरे घालून मिक्सरवर वाटून घेऊन एका तसराळयात (बाऊलमध्ये) काढून
घ्या व त्यात कच्च्या बटाट्याचा कीस,काकडी व रताळे यांचा कीस
,भिजवलेला साबुदाणा आणि ज्यांना चालते त्यांनी बारीक चिरलेली
कोथिंबीर घालून थालीपीठाचे घट्ट पीठ (आवश्यता वाटल्यास थोडेसे पाणी घाला) भिजवून १५-२०
मिनिटे झाका व मुरत ठेवल्यावर तव्यावर तुपात किंवा तेलावर थालीपीठ ठापून त्यावर बोटाने
गोलाकार चार व मध्यभागी एक भोक पाडून त्यात तूप किंवा तेल सोडा आणि दोन्ही बाजूंनी भाजून घ्या.
लिंबाचे लोणचे व ताजे गोडसर मलईच्या दहयासोबत गरम
थालीपीठ सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment