हिरव्या मिरच्यांची सुक्की चटणी
साहित्य : ८-१० हिरव्या मिरच्या,अर्धी वाटी भट्टीवर भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी सुक्या गोटा खोबर्याचा कीस,एक चमचा जिरे,चवीनुसार मीठ,आंबटपणासाठी २-३ आमसुले
कृती : हिरव्या मिरच्यांची देठे काढून मीठ जिऱ्याबरोबर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
गॅसवर मंद आंचेवर सुक्या गोटा खोबऱ्याचा कीस भाजून घ्या. हा भाजका कीस अर्धी वाटी आणि भट्टीवरून भाजून आणलेले शेंगदाणे अर्धीवाटी घेऊन मिक्सरमध्ये मिरचीबरोबर वाटून घ्या.
आंबटपणासाठी आमसुले सर्वात उत्तम. मिक्सरमध्ये थोडी आमसुले घालून फिरवा.
टीप : आमसुलाऐवजी चिंच किंवा लिंबूरस वापरता येईल. ही चटणी आठवडाभर छान टिकते. आणि हो,जर ही चटणी मिक्सर ऐवजी खलबत्त्यात कुठली तर चटणीला अजूनच चांगली चव येते बरं का.
No comments:
Post a Comment