काकडीचं पिठलं
काकडीचं पिठलं : एक खिरा काकडी साल काढून किसून घ्या. आता एका बाऊलमध्ये पाव
वाटी बेसन पाण्यात कालवून ठेवा. आता गॅसवे एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा .तेल
चांगले तापले की त्यात मोहरी घाला, मोहरी छान तडतडली की त्यात
हिंग घाला. एका हिरव्या मिरचीचे तुकडे करून घाला . त्यावर हळद घालून परतून
घेतल्यावर काकडीचा कीस घाला . तो कीस चांगला वाफवा . त्यात चवीनुसार तिखट आणि मीठ
घालून छान मिसळून घेघ्या. आता त्यावर बाऊलमध्ये पाण्यात कालवउण ठेव लेलं बेसन घाला.
जितकं पातळ हवं असेल तितकं पाणी घालून मस्त वाफ येऊ द्या .
आता गॅसवर एका छोट्या कढल्यात
फोडणी करा. त्यात भरपूर तिखट आणि थोडं मीठ घाला.
गरम पिठल्यावर ही फोडणी घालून
सर्व्ह करा. खूपच छान लागते हे पिठले.
No comments:
Post a Comment