नासी केराबू (Nasi Kerabu)
निळ्या गोकर्णीच्या फुलांचा फ्राइड राईस
नासी केराबू ही एक मलेशियन पारंपरिक निळ्या रंगाच्या फ्राइड-राईसची
(भाताची) लोकप्रिय डिश आहे.
भात शिजवतांनाच त्यात
तांदूळ व पाण्या सोबत निळ्या गोकर्णीच्या
फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. निळ्या गोकर्णीच्या पाकळ्यांमुळे भाताला
उत्तम निळारंग व स्वाद येतो.
नंतर हा शिजवलेला निळ्या
रंगाचा भात एका परातीत काढून घेऊन हाताने
मोकळा करून ठेवतात. दुसरीकडे गॅसवर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल+तुप गरम करून घेऊन
त्यात आले-लसुणाची पेस्ट,जिरे,हिरवी मिरची,कढी
पत्त्यांची पाने,कोथिंबीर,पुदिना व मीठ यांचे मिक्सरवर केलेले वाटण घालून थोडेसे
परतून घेऊन नंतर त्यात तो मोकळा केलेला भात घालून चांगले परतून घेतात.
सॅलड व उभी चिरलेली कोबीची
पाने यांनी गार्निश करून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment