झटपट प्याज डोसा
साहित्य : एक वाटी
रवा,एक वाटी तांदूळाची पिठी,एक वाटी मैदा,एक चमचा जिरे,४-५ काळी मिरी,एक मोठा कांदा –
बारीक चिरून,एक हिरवी मिरची – बारीक चिरून,८-१० कढी पत्त्याची
पाने,चवीनुसार मीठ,दोन टेबलस्पून तेल.
कृती : एका बाऊलमध्ये
रवा, तांदूळाची पिठी, मैदा,मीठ मिक्स करून घ्या व त्यात पाणी घालून डोश्यांसार्खे
सरबरीत पीठ भिजवून घ्या. आता या पिठात हिरवी मिरची, कढी पत्त्याची पाने व
काळी मिरी घालून डावाने नीट ढवळून मिक्स करा. पीठ जर जास्त दाट किंवा घट्ट आहे असे
वाटले तर थोडे पाणी घालून पीठ डोसे घालण्या इतपत सरबरीत बनवून घ्या.
गॅसवर एक नॉन स्टिक तवा किंवा डोसा तवा गरम करा व त्यावर
थोडेसे पाणी शिपडा. तवा सुकला की त्यावर एका वाटीने डोशाचे पीठ घालून वाटीच्या
बुडाने सगळीकडे गोलाकार पसरा. त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरा व चमच्याने डोश्यावर
मध्यभागी आणि कडेने सगळीकडे तेल सोडा व मंद आंचेवर डोसा शिजू द्या. डोसा शिजून
कडेने कुरकुरीत झाला की एका उलथण्याने कडेने तव्यापासून सोडवत जाऊन डोसा तव्यावरून
एका प्लेट मध्ये काढून घ्या.
याच तर्हेने उर्वरित
डोसे बनवा.
ओल्या नारळाची चटणी व
सांबार सोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment