पेरूचे लोणचे
साहित्य : दोन
पूर्ण पिकलेले कमी किंवा बिन बियांचे पेरु,एक टेबलस्पून तेल,एक चमचा मोहरी,एक छोटा चमचा हिंग,एक चमचा मेथीचे दाणे,एक टेबलस्पून लाल मिरचीचे तिखट,एक चमचा गुळाचा कीस,एक टेबलस्पून लिंबाचा रस.
कृती : पेरूच्या वरचे
साल व असल्याच तर आणतील बिया काढून टाका व छोटया फोडी चिरून घ्या. गॅसवर एका
पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करुन त्यांत
मोहरी ,हिंग ,मेथी दाणे ,हळद ,तिखट टाकुण
फोडणी करून घ्या आणि लगेचच पेरू च्या फोडींवर घाला व थोडे पाणी टाकून फोडी शिजू द्या
,मग चवीला मीठ ,गूळ व लिंबाचा रस घालून
एक वाफ काढा.
No comments:
Post a Comment