Search This Blog

Wednesday, 4 September 2013

मेथीचे बेसन पिठले

मेथीचे बेसन पिठले



साहित्य : एक कोवळी गावरान मेथीची जुडी,चणा डाळीचे पीठ ३-४ चमचे (किंवा आवश्यकतेनुसार कमी जास्त करावे),मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,६-७ लसूण पाकळ्यांचे बारीक केलेले तुकडे,३-४ हिरव्या मिरचयांचे तुकडे (चवीनुसार कमी जास्त करावे),चवीनुसार मीठ,७-८ ताजी कढीपत्याची पाने,२-३ आमसुलाच्या पाकळ्या,एक चमचा जिरे भाजून,अर्धी वाटी सुके गोता खोबरे किसून व भाजून आणि फोडणीचे सामान म्हणजेच ३ मोठे चमचे तेल,मोहोरी,हळद,हिंग,जिरे ई॰
कृती : प्रथम लसणाच्या पाकळ्यांचे तुकडे,हिरव्या मिरचयांचे तुकडे,भाजलेले जिरे,किसून भाजलेले सुके खोबरे,थोडीशी कोथिंबीर व थोडे मीठ घालून मिक्सरमधून वाटण तयार करून घ्यावे (ह्याला कच्चा मसाला म्हणतात)
 कढईत तेल गरम करून त्यात मोहोरी,हिंग,हळद,कढीपट्याची पाने व कच्च्या मसाल्याचे वाटण घालून फोडणी करावी त्यात धुवून चिरलेली मेथी घालावी व थोडे मीठ घालून कढईवर झाकण ठेवून गॅस मध्यम आचेवर ठेवून १०-१२ मिनिटे शिजवून घ्यावी.
मेथी शिजली की त्यात आवश्यकतेनुसार पाणी घालावे व आमसुले घालून चांगले उकळू द्यावे.उकळत असतांनाच एका हाताने डावाने ढवळत राहून दुसर्‍या हाताने बेसन पीठ लावावे. पिठाच्या जास्त गुठळ्या होऊ देऊ नयेत.पुरेसे दाट झाल्यावर पीठ लावणे थांबवावे व माध्यम आचेवर उकळत ठेऊन शिजू द्यावे.वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा व ५ मिनिटे कढईवर झाकण ठेवावे.   
गरम मेथीचे पिठले भाकरी व हिरव्या मिरच्यांचा खर्डा असे सर्व्ह करावे.


No comments:

Post a Comment