Search This Blog

Saturday, 28 September 2013

कणकेची (गव्हाच्या पिठाची)धिरडी

कणकेची (गव्हाच्या पिठाची)धिरडी "



साहित्य : दोन वाट्या कणिक (गव्हाचे पीठ), तिखट, मीठ, हळद, बारीक किसलेला लसूण, जिरेपूड, बारीक चिरलेली कोथिंबीर
कृती : एका मोठ्या बाउलमध्ये कणिक (गव्हाचे पीठ) घेऊन त्यात थोडी हळद, तिखट, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक किसलेला लसूण घाला व मग त्यात पाणी घालून डोश्याच्या पिठाइतके दाट मिश्रण बनवा.
तेल लावलेल्या निर्लेपच्या तव्यावर डावाने तयार मिश्रणाची छान पातळ धिरडी घालून वर  झाकण ठेवा. दोन्ही बाजूनी धिरडी चांगली भाजून घ्या आणि वर साजूक तूप घालून आवडेल त्या चटणी बरोबर सर्व्ह करा.




No comments:

Post a Comment