Wednesday 18 September 2013

तिखट मिठाचा सांजा

तिखट मिठाचा सांजा  ' अर्थातच उप्पिट किंवा शिरा 


साहित्य : दोन वाट्या बारीक रवा, अर्धा कांदा चिरून फोडी करुन,अर्धा बटाटा चिरून फोडीकरुन,अर्धा टोमॅटो चिरून फोडीकरुन ,हिरवा मटार दाणे,मक्याचे दाणे,शेंग दाणे,चवीनुसार हिरव्या मिरच्या,मीठ,साखर,कढी पत्त्याची पाने,थोडी भिजलेली मुगाची व उडदाची डाळ,  फोडणीसाठी तेल, मोहोरी,जिरे,हिंग व हळद,वरुन स्वाद व सजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओल्या नारळाचा चव (खोबरे)
  
कृती : प्रथम  गॅसच्या एका शेगडीवर स्टीलच्या गंजात तीन वाट्या पाणी तापत ठेवावे व दुसर्‍या शेगडीवर एका कढईत चमचाभर तेलावर रवा सोनेरी रंगावर भाजून घ्यावा व एका ताटात काढून घेऊन त्याच कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेवावे,तेल तापल्यावर त्यात फोडणीचे साहित्य मोहोरी,जिरे,हिंग,हळद ह्या क्रमाने घालून मग कढिपत्याची पाने व मिरचीचे तुकडे घालावेत व परतून घ्यावे,नंतर त्यात कांदा,बटाटा,मटार, मक्याचे दाणे,शेंगदाणे व शेवटी टोमॅटो घालून परतून घ्यावे,मग त्यात गरम पाणी घालून एक उकळी आल्यावर भाजून ठेवलेला रवा घालावा,रवा घालतांना उलथन्याने एकसारखे हलवत राहावे म्हणजे गुठळ्या होणार नाहीत.सर्व रवा घालून झाल्यावर कढईवर एक ताटात पाणी घालून झाकून ठेवावे,व एक वाफ येऊ द्यावी. वरच्या ताटातील पाणी वाफेने उकळू लागल्यावर ताट काढून ते पाणी सांज्यात घालावे व एकदा उलथन्याने हलवून घेऊन पुन्हा ताट झाकून ठेवावे. 

सर्व्ह करतेवेळी डिशमध्ये सांजा काढल्यावर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर व किसलेले ओले  खोबरे घालून खायला द्यावे.   

No comments:

Post a Comment