भरली मिरची
साहित्य : ६-७ पोपटी-हिरवा रंग असलेल्या जाड मिरच्या , ३ मोठे चमचे चणा डाळीचे पीठ (बेसन) मध्यम आचेवर खमंग
भाजून , ३ मोठे चमचे
सुके गोटा खोबरे किसून व मध्यम आचेवर भाजून
व पूड करून , १ चमचा धने-जिरे पूड, १
चमचा पांढरे तीळ मध्यम आचेवर खमंग भाजून,१ चमचा बडीशेप मध्यम
आचेवर भाजून , १ चमचा लाल तिखट (मिरची पावडर) , १ चमचा साखर , १/२ चमचा गरम मसाला , ३-४ लसूण पाकळ्या , ३ मोठे चमचे लिंबाचा रस , ४ मोठे चमचे तेल , मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर , चवीपुरते मीठ,हिंग
कृती : मिर्च्यांचे देठ तसेच ठेऊन उभी चीर घ्यावी व आतील ७५ टक्के बिया काढून
टाका. १/२ चमचा तेलात थोडे मीठ व १/२ चमचा लिंबाचा रस घालून ते ह्या मिरच्यांना
आतून-बाहेरून चोळून ठेवा.मिक्सरमधून खमंग भाजलेले बेसन,सुक्या खोबर्याची पूड,बडीशेप,तीळ,लसणाच्या पाकळ्या ह्या सर्वांचे थोडे पाणी घालून
वाटण करून घ्या. एका भांड्यात हे वाटण, धने-जिरे पूड, लाल तिखट, गरम मसाला, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, हिंग, चवीनुसार मीठ व मावेल इतपतच पाणी घालून ( फार सैल नाही परंतु घट्टही नाही
) कालवून घ्यावे आणी हलक्या हाताने मिरच्यांमध्ये नीट भरावे. ( पोकळ/कमी भरू नये )
एका नॉनस्टिक तव्यावर एक चमचा तेल घालून सगळ्या मिरच्या सहज उलटता येतील अश्या
लावाव्यात. बाजूने व वरून थोडे तेल सोडून झाकण ठेवावे. सात-आठ मिनिटांनी
उलटवाव्यात मात्र झाकण ठेवू नये. पुन्हा पाच मिनिटांनी कुशीवर वळवून ठेवून थोडे
तेल सोडावे.दोन्ही बाजूने चांगल्या खरपूस होऊन किंचितशा लागल्यावर लगेच गासवरून
उतराव्यात.
तोंडीलावणे म्हणून
ह्या मिरच्या चांगल्याच आहेत परंतु एखादेवेळी भाजी कमी असेल किंवा जर अजिबातच नसेल तर ह्या मिरच्या ती भाजीची उणीव नक्कीच
भरून काढतील.
No comments:
Post a Comment