Search This Blog

Wednesday, 11 September 2013

चुटी चुरम्याचे लाडू

चुटी चुरम्याचे लाडू 



साहित्य : दोन वाट्या मैदा,अर्धी वाटी चाळलेली कणीक,चवीपुरते मीठ,पाव वाटी खसखस,

कृती : परातीत २ वाट्या मैदा व त्यात १/२ वाटी कणीक घालून चवीपुरते  किंचितसे मीठ घालून पीठ घट्ट भिजवावे व त्याच्या अतिशय पातळ अशा पुर्‍या लाटाव्याव तेलात कुरकुरीत तळून घ्याव्या.नंतर ह्या पुर्‍या कुसकरून त्यचा जाड्सर रवा काढावा साधारण ३ वाट्या रवा होतो. 
पाव वाटी जाड पोहे (कांदे पोहयाचे) ह्याच तेलात तळून घेऊन ते ह्या चूर्‍यामधे मिक्स करावेत. 
पाव वाटी खसखस भाजून घ्यावी,त्यात एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्यचे भरड तुकडे,अर्धी वाटी सुक्या खोबर्‍याचा कीस थोडासा भाजून घालावा व सर्व वस्तू एकत्र करून मोजावे व त्याच्या अर्धा किसलेल्या गूळाचा कडक किंवा गोळीबंद पाक करून वरील मिश्रण व दोन चमचे गरम केलेले साजूक तूप घालावे व तुपाच्या हाताने छोट्या आकाराचे लाडू वळावे.

No comments:

Post a Comment