Search This Blog

Thursday, 12 September 2013

ताकातील उकड

"ताकातील उकड "


  
साहित्य : २ वाट्या ताजे  आंबट ताक , तांदळाचे पीठ (ज्वारीचेही चालते), ३-४ लसणाच्या पाकळ्या , आल्याचा छोटा तुकडा ,
३-४ हिरव्या मिरच्या (चवीनुसार) , फोडणीसाठी  दोन चमचे तेल व मिसळणीच्या डब्यातील छोटा चमचा मोहोरी , जिरे,हिंग, हळद,मेथ्या,५-६ कढीपत्त्याची ताजी पाने,बारीक चिरलेली कोथिंबीर,चविसाठी चिमूटभर साखर, चवीनुसार मीठ.

कृती : प्रथम गॅसवर एका कढईमध्ये तेल गरम करावे. तेलात मोहोरी, जिरे, हिंग, हळद, कढिपत्ता, मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी द्यावी. त्यातच  लसणाच्या पाकळ्या व आले ठेचून घालावे. सर्व व्यवस्थित परतले की त्यात ताक घालावे. ताकाला उकळी येईस्तोवर ढवळत राहावे म्हणजे ताक फुटणार नाही. ताकाला उकळी आली की त्यात चवीपुरते साखर व मीठ घालावे. तांदळाचे पीठ वरुन भुरभुरावे. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घ्यावी कारण भराभर पिठ घातले तर हमखास गुठळ्या होतात. उकडीला जेवढा घट्टपणा हवा असेल तेवढे तांदळाचे पीठ हळूहळू घालत ढवळत राहावे. कढईवर एका ताटात पाणी घालून झाकावे व दोन चांगल्या वाफा  काढाव्यात. वरच्या ताटातील पाण्यास उकळी आल्यावर समजावे झाली आपली ताकातली उकड तय्यार !
सर्व्ह करतेवेळी गरमागरम उकडीवर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून थोड्यावेळ झाकून ठेऊन मगच सर्व्ह करावी. 

No comments:

Post a Comment