इडलीचा उपमा
साहित्य : इडलीचा भरड असा चुरा,भाजलेले शेंगदाणे,चवीप्रमाणे हिरव्या मिरचयांचे
तुकडे,मीठ,साखर,बारीक
चिरलेली कोथिंबीर, लिंबाचा रस व फोडणीसाठी तेल,हळद,जिरे,मोहरी,हिंग.
कृती : कढईत फोडणीसाठी तेल टाकून तापल्यावर त्यात मोहरी,जिरे,हळद,हिंग,कढीपत्याची पाने,हिरव्या
मिराचांचे तुकडे,भाजलेले शेंगदाणे टाका व परतवून झाल्यावर
त्यात इडलीचा भरड केलेला चुरा,चवीनुसार मीठ ,साखर व लिंबाचा रस टाकून सर्व मिश्रण चांगले एकजीव होईल असे हलवून घ्या,कढईवर एक ताट झाकून ताटात थोडे पाणी घाला व एक वाफ येऊ द्या.ताट काढल्यावर
बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पुन्हा ५ मिनिटे झाकून ठेवा व नंतर डिशमधून सर्व्ह
करा.
No comments:
Post a Comment