Search This Blog

Tuesday, 24 September 2013

भेंडीचा रस्सा

भेंडीचा रस्सा "


साहित्य  :  हिरवीगार कोवळी भेंडी पाव किलो (चार माणसे आरामात खाऊ शकतात), अर्धी वाटी आंबट दही, आल्याचे बारीक तुकडे , चवीनुसार दोन-तीन  हिरव्या मिरच्या, चवी पुरती साखर, जाडसर शेंगदाण्याचे कुट दोन चमचे, एक चमचा मगज बी , फोडणीसाठी तूप, हिंग, जिरे, चवीसाठी थोडे मीठ. 

कृती : सर्वप्रथम भेंडी स्वच्छ  धुवून घ्यावी. देठ काढून भरली भेंडी करतो तशी मध्यभागी चिर द्यावी. दही, आल्याचे बारीक तुकडे , हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, दाण्याचे  कुट एकत्र करुन मिक्सरमधून बारीक करुन घ्यावे. नंतर तूपाची फोडणी करावी. चिरलेली भेंडी फोडणीत घालून परतावी. भेंडी मऊ होईपर्यंत दही घालू नये. नंतर दही, शेंगदाण्याचे कुट आणि मगज बी ह्यांचे वाटण भेंडीवर घालावे. अर्धा चमचा हळद टाकावी. गॅस मंद ठेवून ऊकळी आल्यानंतर भेंडीरस्सा एका बाउलमध्ये काढावा. सर्व्ह करतेवेळी वरुन सजावटी साठी नारळ चव व बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घालावी.



No comments:

Post a Comment