Thursday 26 September 2013

तिखमिखले (एक झटपट तोंडी लावणे)

तिखमिखले (एक झटपट तोंडी लावणे) "


साहित्य : तीन चार जाड कमी तिखट असलेल्या हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी दही (फार आंबट नको),चवीपुरते मीठ,मिरच्यांना चोळायला तेल,दोन चमचे शेंगदाण्याचे बारीक कूट   

कृती : प्रथम हिरव्या मिराचांना तेलाचे बोट लावून त्या गॅसवर सर्व बाजूंनी खरपूस अश्या भाजून घ्या. एका छोट्या स्टीलच्या बाउलमध्ये त्या चांगल्या कुस्करून घेऊन त्यावर दही व चवीपुरते मीठ घालून मिक्स करून घ्या.झाले आपले हे झटपट तिखामिखले तय्यार ! (फार घट्ट वाटल्यास थोडे दूध किंवा ताक घालून हवे तेव्हढे पातळ करावे)
आयत्यावेळी  गरम पोळीबरोबर एक झटपट तोंडी लावणे म्हणून हे मस्त चविष्ट असे तिखामिखले !

No comments:

Post a Comment