Search This Blog

Friday, 27 September 2013

कुळथाचे पिठले

कुळथाचे पिठले  "


साहित्य :  दोन मोठ्ठे चमचे कुळथाचे  पीठ,चवीनुसार हिरव्या मिरचयांचे तुकडे,मीठ,लसूण तीन पाकळ्या ,आमसुलाची दोन पाकळ्या, चवीपुरता गुळाचा खडा फोडणीसाठी कोण चमचे तेल,जिरे,हिंग हलद,मोहोरी,बारीक चिरलेली कोथिंबीर व कढीपत्त्याची पाने.
कृती :  सर्वात प्रथम गॅसवर एका  कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेऊन तेल तापल्यावर त्यात मोहोरी टाका,मोहोरी तदतडल्यावर त्यात जिरे, हळद,हिंग,कढीपत्त्याची पाने व मिरच्याङ्के तुकडे टाकून परतून घ्या,मग हवे तसे पाणी टाकून त्यात चवीनुसार चिंच अगर अमसुल व मीठ घालून उकळी येऊ द्या.पाणी उकळू लागल्यावर त्यावर कुलथाचे पीठ भुरभुरून लावावे व डावाने हलवत राहा म्हणजे गुठळया होणार नाहीत .पीठ लावून पुरेसा घट्टपणा आल्यावर गॅस बंद करा.वर बारीक चिरलेली कोथिंबीर व ओल्या खोबर्‍याचा चव गाळून ५ मिनिटे तात झाकून ठेवा.
पोळी किंवा भाताबरोबर पिठले छान लागते. 

No comments:

Post a Comment