Thursday, 15 March 2018

मठ्ठा

मठ्ठासाहित्य : आंबट ताक,आले,हिरवी मिरची,साखर ,मीठ व भाजके जिरे पावडर,कोथिंबीर 
कृती : ताज्या घुसाळलेल्या आंबट ताकात थोडे आले हिरवी मिरची वाटून लावली ,चवीपुरते मीठ टाकले ,थोडीशी साखर टाकली ,कोथिंबीर चुरून टाकली कि झालाच टेस्टी  मठ्ठा  तयार !   त्यात स्वादासाठी भाजक्या जिर्‍याची पूड टाकावी व फ्रिजमध्ये थंड करण्यास ठेवावे.  
 पूर्वी लग्नाच्या पंक्ती मध्ये जिलेबी किंवा बुंदी आगर मोतीचूर लाडवाचे पक्वान्नाबरोबर ह्याची उपस्थिती अनिवार्य असे लग्नाच्या पंक्ती मधील जिळेबीचे किंवा बुंदी / मोतीचूर लाडवाचे जड जेवण पचविण्यास मदत करणार्‍या  या चविष्ट पेयाला मठ्ठा  हे अत्यंत मठ्ठ नांव कुणी  का बरे दिले असेल ?