सातूच्या पिठाचे लाडू
साहित्य : दोन
वाट्या सातूचे पीठ,दोन
वाट्या कणीक (गव्हाचे पीठ) , अडीच वाट्या पिठीसाखर , दोन वाट्या साजूक तूप , एक छोटा चमचा वेलची पूड,एक टेबलस्पून भिजवलेल्या बदामांचे काप.
कृती : दोन
वाट्या साजूक तुयात कणीक व सातूचे पीठ मंद आंचेवर खरपूस व खमंग वास सुटून
लालसाररांग येतोवर भाजून घ्यावे. ही दोन्ही पिठे भाजून घेतल्यावर थोडीशी गार
झाल्यावर त्यात पिठीसाखर व वेलची पूड व भिजवलेल्या
बदामांचे काप मिक्स करावे व मिश्रण गार
झाल्यावर तुपाच्या हाताने या मिश्रणाचे नेहमीसारखे लाडू वळावेत.
No comments:
Post a Comment